'ताली' (𝐓𝐚𝐚𝐥𝐢)

𝐓𝐚𝐚𝐥𝐢 
'ताली'

jio cinema ह्या OTT वर हिंदी, इंग्रजी, मराठी, बंगाली सह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. 35 ते 40 मिनिटांचे सहा नेटके भाग असणारी ही सिरीज आणि कुठेही न भरकटलेली कथा.आपल्या रवी जाधवजींचे दिग्दर्शन असल्याने हेमांगी कवी,ऐश्वर्या नारकर,सुव्रत जोशी असे ओळखीचे चेहरेही दिसले.

त्यांनी आपापल्या सहाय्यक भूमिका उत्तम साकारल्या आहेत.ही सिरीज गौरी सावंत ( Shreegauri Sawant... Transgender activist) ह्यांच्या जीवनावर त्याहीपेक्षा त्यांच्या संघर्षावर बेतलेली आहे. Transgender ना third gender म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी,त्यांना इतर नागरिकांप्रमाणे सगळे मूलभूत हक्क मिळावेत म्हणून केल्या गेलेल्या धडपडीची ही गाथा आहे... 

'ताली' ची सुरुवातच होते संत तुकाराम महाराजांच्या 'जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,तोचि साधु ओळखावा,देव तेथेचि जाणावा' या अभंगाने.या संपूर्ण वेब सीरीजचा सार या एका अभंगात आहे.रंजल्या गांजल्यांची सेवा करणाऱ्यालाच देव म्हणावे असा याचा अर्थ आणि श्रीगौरी सावंत ही तृतियपंथीय, ट्रांसजेडरसाठी एखाद्या देवापेक्षा कमी नाही.गौरीच्या भूमिकेसाठी सुष्मिता सेनची निवड करून दिग्दर्शक रवी जाधवने बाजी मारलीय.सुष्मिताची उंची हा एक अत्यंत सशक्त पैलू आहे.सुष्मिता सेन गौरीची भूमिका अक्षरशः जगलेली आहे.पहिल्या फ्रेमपासून ते शेवटच्या फ्रेमपर्यंत सुष्मिता पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवताना दिसते.तृतीयपंथियांसाठी काम करण्यात येणाऱ्या अडचणी,रुग्णालयात तृतीयपंथियाचे पडलेल्या शवाला न्याय देण्यासाठी केलेले अनोखे आंदोलन,भर मंचावर तृतीयपंथियाची बाजू मांडतानाचा आविर्भाव आणि एवढेच नव्हे तर पुरुष असलेल्या देहातील स्त्रीची तडफड सुष्मिताने अत्यंत उत्कृष्टपणे पडद्यावर मांडलेली भूमिका आपल्याला पाहण्यास मिळते.

एक दोन ठळक मुद्दे सिनेमात दिसले ते असे की काही लोक ह्यांची खोटी सोंगे घेऊन भीक वसूल करतात त्यामुळे बदनाम मात्र हे होतात.दुसरे असे की फॉरेनमध्ये कुठेही असे रस्त्यावर टाळ्या वाजवत भीक मागणारे तृतीयपंथी दिसत नाहीत...मग आपल्याच देशात का समाज त्यांना स्वतःचा एक भाग म्हणून स्वीकारू शकत नाही? आधी कुटुंबाने त्यांना स्वीकारले पाहिजे पण हे सगळे महाकठीण आहे... पुरुषप्रधान संस्कृतीची पाळे मुळे इतकी खोलवर रुजली आहेत की आजही मुलगा व्हावा म्हणून लोक भलभलते दिव्य करतात. लेबर रूमच्या बाहेर ती बाई जिवंत आहे का ह्या प्रश्नापेक्षाही  मुलगा झाला का ?हा प्रश्न अधिक महत्वाचा असतो... ह्या लोकांची सामान्य माणूस म्हणून जगण्याची धडपड ही सिरीजमध्ये उत्तम अधोरेखित केलेली आहे.. 

तृतीयपंथी यांच्याबाबतीत अजूनही अनेकजण  अबनॉर्मल आहेत.मला आधी फार भीती वाटायची यांची. कारण? माहीत नव्हतं.कदाचित अबनॉर्मल लोकांनी माझ्या डोक्यात सोडलेल्या काही कल्पना असतील.हे दिसले की लांबून पळायचो.पण जेव्हापासून बऱ्याच प्रमाणात वाचन अन त्या लोकांना भेटत गेलो तेव्हापासून आयुष्य आपण एका समाजातल्या घटकांना दूर ठेवून बसलो,ते ही नॉनसेन्स कारणांमुळे.आता कुठे ही भेटले तर प्रेमाने चार शब्द बोलतोय...


इस ताली की गूँज दूर दूर तक जाने के बजाए अपने दिल में उतर जाए तो बेहतर होगा. 
#𝐫𝐚𝐯𝐢𝐟𝐚𝐥𝐭𝐚𝐧𝐤𝐚𝐫

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

​तुम्ही अजून ग्रामपंचायत कर भरला नाही? मग थांबा! मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत मिळतेय ५०% सूट; पहा सविस्तर माहिती.

MyScheme अ‍ॅप : केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची आता एकाच ठिकाणी माहिती मिळवा.

🌾 नाफेड म्हणजे काय? – शेतकऱ्यांचा हमीभावाचा खरा आधार