पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सर्कस..🤡🎭

इमेज
सर्कस...🤡🎭 संध्याचा काळ हा डिजिटल होत चालला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली टेक्नॉलॉजी, त्यामुळे शहरात असो किंवा गावं खेड्यातील बऱ्याच गोष्टीं ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.पहिल्यादा ग्रामीण भागात मनोरंजन करण्यासाठी बऱ्याच कला सादर केल्या जात होत्या त्यातील काहीच शिल्लक राहिल्या आहेत. त्यातील एक म्हणजे सर्कस होय,बऱ्याच वर्षानंतर गावात सर्कस आली,संपूर्ण गावं कधीच एकत्र बसत नाही.काही ठराविक कार्यक्रमांनाचं एकत्र येत त्यातील एक म्हणजे सर्कस असो किंवा महापुरुषांच्या जयंत्या.घरातील लहानांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वच मनोरंजन पाहण्यासाठी सर्वच एकत्र येतात. आताच्या सर्कस मध्ये दम राहिलेला नाही ही गोष्ट मात्र खरी.१० ते १५ वर्षांपूर्वी गावात प्राणिसंग्रहाल असलेल्या सर्कशी येत होत्या, त्यामुळे गावात उंट, घोडे, अस्वल, कुत्रे, रंगीत पोपट,असे प्राणी सर्कशी मध्ये दिसत. कधी कधी जाहिरात म्हणून सगळ्या मोठ्या प्राण्यांची मिरवणूक गावातूनच निघायची.ती नसली तरी सर्कसच्या खेळात सगळ्या कलाकारांची आणि प्राण्यांची परेड असायची.तीच कितीतरी मोठी असायची आणि बराच वेळ चालायची. ...

Artificial Intelligence (AI)याळमुे मीडिया क्षेत्रात येत असलेल्या नवीन पत्रकारिता पिढीवर काय परिणाम होऊ शकतो आणि नेमकं AI म्हणजे काय....?

इमेज
( Artificial Intelligence AI ) यामुळे मीडिया क्षेत्रातील कोणत्या लोकांवर याचा परिणाम पडणार आहे,ते आज आपण पाहणार आहोत. पहिले आपण पाहूया AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे. आर्टिफिशयल इंटेलिजन्स हे टेक टिप्स कॉम्प्युटर सायन्स चा एक भाग आहे. एआय ही यंत्रणा, विशेषत: संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्ताचे नक्कल करून काम करते. एआय तंत्रज्ञानाच्या मार्फत कोणतीही मशीन मनुष्या सारखे बोलू, वाचू किंवा कोणतीही गोष्ट सहज समजू शकते. AI तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन मनुष्या सारखे स्वतः डोकं वापरून काम करू शकते. जसे की भाषा ओळखणे, विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, काम करणे, एकमेकांशी संवाद साधणे, इत्यादी गोष्टी करू शकते. आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी Advance झाल्याचे आपण पाहतो.भविष्यामध्ये येणारे २१ वे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाईल. इंडिया टू डे ग्रुपच्या वाईस चेअरपर्सन कल्ली पुरीनं अलीकडेच टू डे ग्रुपच्या परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) आधारित अँकर बॉट लॉन्च करण्याची ...