सर्कस..🤡🎭

सर्कस...🤡🎭


संध्याचा काळ हा डिजिटल होत चालला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली टेक्नॉलॉजी, त्यामुळे शहरात असो किंवा गावं खेड्यातील बऱ्याच गोष्टीं ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.पहिल्यादा ग्रामीण भागात मनोरंजन करण्यासाठी बऱ्याच कला सादर केल्या जात होत्या त्यातील काहीच शिल्लक राहिल्या आहेत. त्यातील एक म्हणजे सर्कस होय,बऱ्याच वर्षानंतर गावात सर्कस आली,संपूर्ण गावं कधीच एकत्र बसत नाही.काही ठराविक कार्यक्रमांनाचं एकत्र येत त्यातील एक म्हणजे सर्कस असो किंवा महापुरुषांच्या जयंत्या.घरातील लहानांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वच मनोरंजन पाहण्यासाठी सर्वच एकत्र येतात.

आताच्या सर्कस मध्ये दम राहिलेला नाही ही गोष्ट मात्र खरी.१० ते १५ वर्षांपूर्वी गावात प्राणिसंग्रहाल असलेल्या सर्कशी येत होत्या, त्यामुळे गावात उंट, घोडे, अस्वल, कुत्रे, रंगीत पोपट,असे प्राणी सर्कशी मध्ये दिसत. कधी कधी जाहिरात म्हणून सगळ्या मोठ्या प्राण्यांची मिरवणूक गावातूनच निघायची.ती नसली तरी सर्कसच्या खेळात सगळ्या कलाकारांची आणि प्राण्यांची परेड असायची.तीच कितीतरी मोठी असायची आणि बराच वेळ चालायची.

मी रात्री गावात पाहलेल्या सर्कशीच्या कार्यक्रमात बिना बीरेकची सायकलचे वेगवेगळ्या प्रकारचे ५ ते ६ स्टँड पाहिले,थोडीसी कॉमेडी आणि शेवटी हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर नाचण्याचा कार्यक्रम अन सर्कशीच्या कार्यक्रमाची सांगता.

कलाकार ज्या कमानीतून येतात त्याच्या वरच्या भागात पूर्वी बँड पथक असायचं आणि प्रसंगानुरूप संगीत वाजवायचे.आता सगळं संगीत पेन ड्राईव्ह मध्ये असतं. कालच्या सर्कस मध्ये ती कमान पण एकदम छोटी आणि तकलादू होती.मला त्या बँड वाल्यांच्या जागी बसून सर्कस बघण्याची फार इच्छा व्हायची.आता ते जमणं अशक्यच.

बाकी कलाकारांच्या वैयक्तिक कौशल्याबाबत काही तक्रार नाही.ते सगळे पूर्वीही उत्तमच होते आणि आत्ता पण आहेत.पण दोन अडीच तास फक्त वैयक्तिक किंवा सांघिक कौशल्य पाहत राहण्याचा कंटाळा येऊ शकतो.कारण कुठे ना कुठे त्याला मर्यादा आहेत.अर्थात त्यातही खूप वेगवेगळे प्रकार असतातच. फक्त कसरतींवर भर न देता कौशल्य प्रकारांची संख्या वाढवली तर जास्त मजा येईल.

अर्थात या सगळ्याच्या मागे आर्थिक गणित हा मोठा विषय आहे.लोकं पहिल्या सारखे कार्यक्रम पाहिल्यावर पैसे देत नाहीत कारण आता देशा विदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या सर्कशी आता आपल्याला हव्या त्या वेळी मोबाईल वर पाहता येतात.एवढपण आणि अनेक कारणांनी सर्कसचा व्यवसाय संपत चाललाय असं वाटतंय.

आता दिमाखदार सर्कस बघायची असेल तर ती जुनी आठवन म्हणून डोळे बंद करून आठवणीतच ! 
#सर्कस         
#ravifaltankar  

©Ravi Faltankar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

​तुम्ही अजून ग्रामपंचायत कर भरला नाही? मग थांबा! मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत मिळतेय ५०% सूट; पहा सविस्तर माहिती.

MyScheme अ‍ॅप : केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांची आता एकाच ठिकाणी माहिती मिळवा.

🌾 नाफेड म्हणजे काय? – शेतकऱ्यांचा हमीभावाचा खरा आधार