गायरान....🌱🌳🌲
गायरान..🌱🌳🌲
दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या अन त्यामुळे मोठ्या प्रमाणत होणारे प्रदूषण यामुळेच ऑक्सिजनच प्रमाण कमी होत आहे. सध्या कोरोनो सारख्या महामारीमुळे बऱ्याच लोकांना ऑक्सिजन बेड मिळत नाही. अन त्यामुळे बऱ्याच लोकांचे मृत्यू झाल्याचे आपण सोशल मीडियावर किंवा बातम्यात पाहिले असेल. दिवसेंदिवस झाडांचं प्रमाण कमी कमी होत चालले आहे. अगोदर प्रत्येक गावाला जिथे सर्वांचे सामूहिक गुरे ढोर चरत होते तसे गायरान मोठ्या प्रमाणात होते. आता दिवसेंदिवस हे गायरान कमी कमी होत चाललेले आहे. बऱ्याच लोकांनी गायराणातील झाडे तोडून तेथे शेतं काढून शेती करायला सुरुवात केली आहे. यामुळे गायराणात आढणाऱ्या दुर्मीळ वनस्पती आणि त्यामधील तोडलेल्या झाडांमुळे तेथे राहत असलेले पक्षी अन इकडून तिकडून स्थलांतर करणारे पक्षी फार मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत.सरकारने तसेच प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी गायराणाकडे लक्ष देऊन झाडे तोडणे आणि गायरान काढणे थांबवावे,नाहीतर येणाऱ्या काळात प्रत्येकाला ऑक्सिजन पम्प पाठीवर घेऊन मिरवावे लागेल...हे दिवस येऊ नये म्हणून प्रत्येकाने यंदा पावसाळ्यात कमीत कमी 5 झाडे लावावे आणि ते जगवावे...
®️✍️ : रवि फलटणकर
Nice 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाNice line ravi
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाअगदी बरोबर 👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा🔥🔥
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवारवी👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाOsm Bro 👍🏻
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाफारच अत्यावश्यक मुद्द्यावर ब्लॉग लिहिला आहे आपण.
उत्तर द्याहटवासिमेंटचे जंगल उभे करत असताना, कमी होत चाललेले गायरान, फारच चिंतेची बाब आहे.
यावर उपाय हा केलाच पाहिजे झाडे लावली आणि जोपसली गेलीच पाहिजेत. खूपच छान l